---Advertisement---

सीबीएससी पॅटर्न नुसार यंदा भरणार सोयगाव तालुक्यात पहिलीचा वर्ग; सोमवारपासून शैक्षणिक पर्वाचा होणार श्रीगणेशा

---Advertisement---

सोयगाव : तालुक्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षांत जिल्हा परिषदेच्या शंभर प्राथमिक शाळांची घंटा सोमवारी (दि. १६) सी बी एस ई पॅटर्ननुसार निनादणार आहे. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे यांनी दिली. शाळा स्तरावर समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके पोहोच झाल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत पुस्तकांनी होणार आहे. यंदा प्रथमच शंभर शाळेत पहिलीपासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असल्याने मराठी शाळा गजबजून जाणार आहेत.

तालुक्यात शैक्षणिक जनजागृतीसाठी जूनपासून शाळा स्वच्छता मोहीम, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छाता,शाळा व्यवस्थापन समिती बैठका,पालक भेटी आदींच्या माध्यमातून शैक्षणिक पर्वाचा श्रीगणेशा झाला आहे, असे गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले. पालकांनी मराठी शाळेत प्रवेशाबाबत सोशल मीडियावर विविध शिक्षकांच्या ग्रुपमध्ये जोरदार जाहिरातबाजी सुरू असल्याचे चित्र आहे. यंदा शाळेच्या पहिल्या दिवसापासून तालुक्यात शैक्षणिक क्रांती घडविण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.

---Advertisement---

ठिकठिकाणी स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गोड जेवण,गुलाबाचे फुले आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत,विद्यार्थी सजविलेल्या वाहनांतून,बैलागडी,घोडगाडी,ट्रॅक्टरद्वारा मिरवणूक,शिक्षण पालखी आदी उपक्रम तालुक्यात राबविले जाणार आहेत.शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,शिक्षणप्रेमी,अधिकारी शाळांमध्ये मुलांचे स्वागत करणार आहेत.

तालुक्यात सोमवार(दि.१६)( दि.२३)शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना आहेत.. शाळा प्रवेशोत्सवाच्या स्वागतासाठी विविध शिक्षणपूरक उपक्रम राबविण्याचे शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांना आदेश दिले आहेत. शाळा उघडण्यापूर्वी शिक्षकांनी शाळेत जाऊन शालेय परिसर स्वच्छ करणे, सुशोभित करण्याकडे लक्ष द्यावे.योग दिन साजरा करणे, शालेय आवारात वृक्षारोपण करणे. व्यवस्थापन समितीची सभा आदिंच्या सुचना देण्यात आल्या आहेत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---