---Advertisement---

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहाडी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. मोहाडी गावाचे सरपंच धनंजय सोनवणे ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षण प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, बुके देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी खास सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. पहिल्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट, सॉक्स वाटप करण्यात आले. मध्यान भोजनांतर्गत मिष्ठांन्न जिलेबी देण्यात आले.

---Advertisement---

इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत सुरेखा जोशी व कविता चव्हाण यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी मोहाडी गावाचे सरपंच धनंजय सोनवणे, शाळेचे मुख्याध्यापक भीमराव पवार, उपशिक्षक गणेश बागुल, सुरेखा जोशी, भारती शिंपी, टीना सोनवणे, कविता चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सीमा सुरवाडे, व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---