---Advertisement---
Investment : बीएसईमध्ये सूचिबद्ध केमिकल ट्रेंडिंग कंपनी ए-१ लिमिटेडने आपल्या भागधारकांसाठी मोठी कॉर्पोरेट ऍक्शन जाहीर केली आहे. कंपनीने ३:१ बोनस इश्यू आणि १०:१ स्टॉक स्प्लिटची घोषणा केली असून, यामुळे गुंतवणूकदारांना १ शेअरवर एकूण ४० शेअर मिळणार आहेत. बोनस ईश्यूची रेकॉर्ड डेट ३१ डिसेंबर २०२५, तर स्टॉक स्प्लिटसाठी ८ जानेवारी २०२६ निच्शित करण्यात आली आहे.
दरम्यान, ए-१ लिमिटेडने कंपनी ए-१ सुरेजा इंडस्ट्रीजमध्ये आपली हिस्सेदारी ४५ टक्क्यांवरून ५१ टक्क्यांपर्यंत वाढवली असून, हा व्यवहार १०० कोटींच्या एंटरप्राइज व्हॅल्युएशनवर पूर्ण झाला आहे.
hurry-e ब्रॅंडखाली बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीत बहुसंख्य भागीदारी मिळाल्याने ए-१ लिमिटेडची ग्रीन मोबिलिटीतील उपस्थिती मजबूत झाली आहे.
कंपनीने FY २०२३-२४ मध्ये ४३.४६ कोटींचा महसूल नोंदवला असून, पुढील काळात वेगवान वाढीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच GNFC आणि सोलर इंडस्टीत इंडिया लिमिटेडसोबत १०,००० मेट्रिक टन नायट्रिक ऍसिड पुरवठ्याचा दीर्घकालीन करार आणि १५०. ४५ कोटींचा इन्स्ट्रियल युरियाचा ऑर्डर मिळाल्याने व्यवसायाला बळ मिळाले आहे.
पाच दशकांची परंपरा असलेल्या ए-१ लिमिटेड आता केमिकल्ससोबत इव्ही व ग्रीन एनर्जी क्षेत्रात ठोस पावले टाकत मल्टी व्हर्टिकल ग्रीन एंटरप्राइज बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.









