तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । जामनेर तालुक्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना-नायकडा समाज कुंभचे आयोजन करण्यात आले असल्याची माहती शाम चैतन्य महाराज यांनी समाजाच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
संपुर्ण भारतभर विखुरलेल्या मोहंजोदडो, सप्त सिंधुचा नायक महा हिंदु धर्माचा रक्षक, हजारो वर्षापासुन इतिहास, परंपरा व संस्कृती जपणारा हिंदु गोर बंजारा व लबाना – नायकडा समाजाला एकत्र आणुन सनातन विचार योग्य दिशा व प्रेरणा देण्यासाठी आणि आपला इतिहास परंपरा धर्म व संस्कृतीचे संवर्धन व संगोपन करून समाज्याच्या संवर्गातील प्रगतीसाठी. संत सेवालाल महाराज आर्शिवचन अनुकरन हेतू व गुरू नानकदेवजी संगत व श्री बालाजी भगवान महाप्रसाद निमीत्त अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना-नायकडा समाज कुंभ 2023 गोद्री ता. जामनेर जि.जळगाव येथे 25 ते 30 जानेवारी 2023 रोजी आयोजीत करण्यात आले आहे. यात धार्मीक विधी पल्ला, मुर्ती स्थापना, कृष्णलिला, अरदास भोग लावणे, संत श्रीसेवालालजी महाराज अमृत लिला, देवीभगत, रामनाव भजन, संत रामदास बापू अमृतवाणी. सांस्कृतीक विधी बंजारा भजन, नगारा खेळ, सांस्कृतीक पारंपारीक पेहरावात पुरूष व महिला यांचा होळी नृत्य, पट खेळणे, साहसी खेळ, तलवार उचलणे, पारंपारीक नृत्य असणार आहे.
या ठिकाणी प्रदर्शनी व स्टॉल तसेच इतिहास (महापुरूष व संत वास्तु), वेशभुषा भाषा (पुस्तके, गीत, कथा) धार्मिक स्थळे, संस्कृती दर्शवनारी प्रदर्शनी असेल. देशभरातील प्रख्यात संत महापुरूषाचे आर्शिवाद, प्रबोधन व प्रवचन तसेच समाजाच्या चालीरिती, परंपरांचे सादरीकरण. या कार्यक्रमास समन्वयक अखिल भारतीय धर्मजागरण समन्वय म्हणुन सहभाग आहे. संत गुरु शरणानंदजी, श्रीशंकराचार्यजी, श्रीरघुमुनीजी, श्रीहरनामसिंगजी, संत श्रीगोविंदगिरीजी, सततंभरा देवीजी, श्रीस्वामी रामदेवजी, श्रीमुरारी बापुजी अशा संताचा सहभाग असणार आहे.
राजकीय व्यक्ती फक्त 30 जानेवारीला अपेक्षीत त्यामध्ये आतापर्यंत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व राज्यातील मंत्री असतील. कुंभ हा धार्मिक व सांस्कृतीक असल्याने इतर दिवशी म्हणजे 25 ते 29 जानेवारीमध्ये संत महंत व समाजातील वक्ते समाजातील लोकांना प्रबोधन करणार आहे
या कुंभात समाजबांधव एकूण 10 लाख पर्यंत येणे अपेक्षीत आहे. क्रार्यक्रमात मुख्यत्वे महाराष्ट्र, आन्ध्र, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात तसेच इतरही राज्यातील समाज बांधव येणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक संत श्रीगोपाल चैतन्यजी महाराज, संत श्रीबाबूसिंगजी महाराज, संत श्रीरामसिंगजी महाराज, संत श्रीसुरेशजी महाराज, संत श्री 1008 चंद्रसिंगजी महाराज, श्रीप्रेमसिंगजी महाराज श्रीअजितजी महाराज, श्रीदर्यावसिंगजी महाराज, श्रीचंदजी महाराज, श्रीप्रसन्नसिंगजी महाराज, श्रीमंगलसिंगजी, संत श्रीरामाजी नाईक, संत श्रीश्यामचैतन्यजी महाराज तसेच सर्व संत हिंदू गोरबंजारा व लबाना नायकडा समाज हे आहेत. कार्यक्रम पुर्णतः धार्मीक व सांस्कृतीकते वर आधारीत आहे.कार्यक्रम गोंद्री तांडा येथे धार्मीक गतविधी व गोंद्री फत्तेपुर रस्त्यावर कुंभ नियोजन करण्यात आले आहे.
कुंभस्थानी 30 हजार समाजबांधवाची निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 20 हजार पुरुष व 10 हजार महिलांचा सहभाग असेल.बंजारा माता-भगीनीना स्टॉल लावण्यास सांगण्यात आले आहे.समाजबांधवासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.शासनाद्वारे रस्ता, विज, पाणी, स्वच्छता विषयात मदत होत आहे.संपुर्ण महाराष्ट्रातून हिंदू गोर बंजारा व लाबाना-नायकडा समाजातून सेवेकरी म्हणुन कार्य करणार आहेत. तसेच सेवेकरी म्हणुन कार्य करायची इच्छा असेल तर ऑनलाईन पध्दतीने राजिस्ट्रेशनच्या माध्यमातुन नोंदणी करू शकतात.या कुंभामध्ये विविध समितीच्या माध्यमातून सेवा करण्याची आध्यात्मीक संधी समाजाला मिळालेली आहे.या कुभाच्या माध्यमातुन संपुर्ण समाज अध्यात्मिक छत्राखाली एकवटला जाणार असुन एक नवीन दिशा कुंभाच्या माध्यमातुन समाजाला मिळणार असल्याची माहिती श्री.गुरुदेव सेवा आश्रमचे श्याम चैतन्य महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रपरिषदेस प्रसिध्दी प्रमुख भाईदास चव्हाण, निलेश चव्हाण, डॉ. राजेश नाईक, डॉ. विश्र्वनाथ चव्हाण, अक्षय जाधव आदीसह समाज बांधव उपस्थित होते.