मोठी बातमी ! मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

#image_title

मुंबई । मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने निघालेली “नीलकमल” नावाची प्रवासी बोट उरण-कारंजा भागात समुद्रात बुडाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

या घटनेत 30-35 प्रवासी असल्याचे प्राथमिक माहितीने सांगितले आहे. सध्या नौदल, JNPT, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार यांच्या सहकार्याने मदत व बचावकार्य सुरु आहे.

घटनेची प्राथमिक माहिती 

बोट बुडण्याचा स्थान : उरण-कारंजा भाग.
प्रवाशांची संख्या : 30-35 (प्राथमिक अंदाज).
बचाव कार्यात सहभागी संस्था : भारतीय नौदल, JNPT, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार.

ही बोट नेमकी कोणत्या कारणाने बुडाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. बोट बुडत असल्याचे समजताच आजूबाजूच्या बोटीनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले.

सद्यस्थितीत नीलकमल बोट पूर्णपणे समुद्रात बुडालेली असून प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ही घटना मोठ्या धोक्याची असून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढील तपशील प्रतीक्षेत आहे.