देशाला प्रगती पथावर नेणारा अर्थसंकल्प – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा अर्थ संकल्प सादर केला, यात युवकांना रोजगार शेती, पायाभूत सुविधांसह अनेक गोष्टींबाबत मोठ्या घोषणा केल्या असून, देशाला प्रगती पथावर नेणार अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की,  तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणणार, 5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे.देशात उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज  दिले जाणार असून दरवर्षी 25 हजार विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात 7.5 लाखांचे कर्ज दिले जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तरुणांना पहिल्या कामावर थेट  त्याच्या (EPFO ) कर्मचारी भविष्य ​​निर्वाह निधीच्या खात्यात 15 हजार रुपये दिले जाणार आहेत.

या अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिलं आहे. सरकारने कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये दिले. गेल्या वर्षी 1.25 लाख कोटी रुपये देण्यात आले होते. म्हणजेच यावेळी शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये 21.6 टक्के म्हणजेच 25 हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे. येणाऱ्या काळाची आव्हाने लक्षात घेवून हा अर्थ संकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाची प्रगती अधिक गतीने होईल असं निश्चितपणे वाटतं