पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक!

पुणे : शरद पवारांच्या ताफ्यातील कारने एका दुचाकीला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही माध्यमांवर व्हायरल झाला आहे. दरम्यान, धडक दिल्यानंतर दुचाकीचालकाच्या मदतीसाठी कुणीही धावून गेलं नसल्याचं या व्हिडीमध्ये दिसत आहे.
https://x.com/i/status/1813157254243160412

शरद पवार पुण्यातील आपल्या मोदीबाग या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या घटनेतील दुचाकीचालक खाली पडला असून किरकोळ जखमी झाला आहे. याबद्दलचा एक व्हिडीओही माध्यमांवर व्हायरल झाला आहे. मात्र, पवारांच्या ताफ्यातील कुणीही दुचाकी चालकाच्या मदतीला धावून जाताना दिसलं नाही.