तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाणांसह दोघांविरुद्ध गुन्हा

तरुण भारत लाईव्ह । १६ जानेवारी २०२३ । तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण, चाळीसगाव येथील उदय पवार आणि जळगावातील शेखर सोनाळकर यांच्याविरोधात पुणे डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सूरज झंवर यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. यावरुन ऍड. चव्हाण यांच्यावर फसवणूक आणि खंडणी सारख्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १६६, २१३, ३८४, ३८५, ३८६, ३८८, ५०६, ३४, १२० ब अंतर्गत त्यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवीण चव्हाण कोण?
प्रवीण चव्हाण हे तेच सरकारी वकील आहेत जे यापूर्वी आपल्या कार्यालयातील एका व्हिडिओमुळं चर्चेत आले होते. विरोधीपक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान विधानसभेत या व्हिडिओचा एक पेनड्राईव्ह सादर केला होता. तसेच गिरीश महाजन यांची केस देखील याच वकिलांकडे होती.