लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, धरणगावच्या तरुणाविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल

---Advertisement---

 

शहादा : लग्नाचे आमिष दाखवून आणि आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन २५ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात धरणगाव (जि. जळगाव) येथील तरुणाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा येथील पीडित २५ वर्षीय तरुणीला संशयित चेतन मधुकर शिंपी (रा. मेन रोड, अभी कलेक्शनसमोर, धरणगाव, जि. जळगाव) याने लग्नाचे आमिष दाखविले होते. २२ जून २०२४ पासून १५ जानेवारी २०२६ दरम्यान संशयिताने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. यामध्ये नंदुरबार येथील हॉटेल गौरव पॅलेस, तसेच सुरत येथील विविध लॉजवर आणि शहादा येथील रामदेवबाबानगर येथे नेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संशयिताने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती. ज्याचा धाक दाखवून तो वारंवार अत्याचार करीत होता. लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने पीडितेच्या आईलाही अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. अखेर पीडितेने या त्रासाला कंटाळून शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित चेतन शिंपी याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक गणेश सूर्यवंशी तपास करीत असून, संशयिताचा शोध सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---