तरुण भारत लाईव्ह ।१४ फेब्रुवारी २०२३। जळगाव- औरंगाबाद महामार्गावर दुपारी एकच्या सुमारास भरधाव वेगाने जळगावकडे जाणारे रिकामे डंपर भवानी फाट्याजवळ उलटल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जळगावकडे भरधाव वेगाने जाणारे डंपर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या केळीच्या वेफर्स दुकानाला टक्कर देऊन उलटले. चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका जणाच्या दुचाकीचा चुराडा झाला आणि त्यांना सुद्धा मर लागला असून त्याना उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले आहे. गाडीमधील वाहक परमेश्वर प्रकाश आधारे (वय २२) याचा दबून जागीच मृत्यू झाला. त्याच ठिकाणी केळी वेफर्सच्या दुकानात काम करणारी अश्विनी प्रल्हाद भोई (वय १८) ही सुद्धा गंभीर जखमी झाली आहे.
पहूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जेसीबीच्या साह्याने पलटी झालेल्या डंपरला बाजूला केले व गाडीखाली दबलेल्या वाहकाला बाहेर काढण्यात आले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. पहूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चौधरी तपास करीत आहेत.