मित्राच्याच २० वर्षीय पत्नीला फोन करून घरी बोलाविले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायकच

जळगाव : आपल्या मित्राच्याच २० वर्षीय पत्नीवर मित्राने विनयभंग केल्याचा संतापजनक जळगावमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून विनयभंग करणाऱ्या पतीच्या ३० वर्षीय मित्रास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पतीच्या मित्राने विवाहितेला फोन करून अर्जंट काम असल्याचे सांगून घरी बोलविले. त्यावर विश्वास ठेवून विवाहिता त्या मित्राच्या घरी गेल्यावर त्याने विवाहितेचा हात पकडून विनयभंग केला. नंतर “तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव”, असे म्हणू लागला. विवाहितेने नकार दिल्यावर त्याने “तू जर माझ्याची प्रेमसंबंध ठेवले नाही, तर तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव”, असे म्हणत विवाहितेसह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकारानंतर भेदरलेल्या विवाहितेने घर गाठले व संपूर्ण हकीकत आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर बुधवारी दुपारी ३ वाजता पतीसोबत रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी पतीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला