---Advertisement---

Chalisgaon Crime : भाऊ, आई वडील यांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

by team

---Advertisement---

चाळीसगाव : तालुक्यातील एका गावात एका १९ वर्षीय तरुणीला फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याबाबत कुणाला सांगितले तर भाऊ, आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी पीडितेला देण्यात आली होती. पिडीत तरूणीच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरूणी ही आई, वडील व भाऊ अशा आपल्याकुटुंबासह रहात आहे. या तरुणीला जुलै २०२४ मध्ये गावातील पूजा शेळके हिने तिच्या घरी बोलविले होते. ती घरी आल्यावर पूजाने तिला एका रूममध्ये ढकलून बाहेरून कडी लावून घेतली. यावेळी रूममध्ये आधीच येवून बसलेला समाधान बाळू शेळके याने जबरदस्ती तरूणीवर अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितले तर भाऊ, आई – वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

यानंतर १६ सप्टेंबर रोजी पीडित तरुणीच्या आई वडिलांच्या समोरच सायंकाळी ७ वाजता तीच व्यक्ती समाधान बाळू शेळके याने दारू पिलेला असताना दारूच्या नशेत तरूणीचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिला आंगावर ओढले.

याबाबत  पिडीत तरूणीच्या कुटुंबाने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पिडीत तरूणीच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---