काँग्रेस जिवंत असेपर्यंत हिंदू; हिंदू राहणार नाही, अश्विनी कुमार उपाध्याय यांचा घणाघात

जळगाव: काँग्रेसने भगव्या ध्वजाला राष्ट्रीय ध्वजाचा दर्जा मिळू दिला नाही. आज भारतात निर्माण होणाऱ्या विविध ५०० समस्यांचे मूळ आहे ते काँग्रेस. भारतावर मुघल आणि ब्रिटिशांनी राज्य केले. त्यामुळे काँग्रेसने त्या दोघांच्या सोईचे होईल अशी व्यवस्था तयार केली. जोपर्यंत काँग्रेस जिवंत राहील तोपर्यंत हिंदू हिंदू राहणार नाही, असा घणाघात उच्च न्यायालयाचे वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केला.

सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात एक देश एक संविधान या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीकांत खटोड, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप करपे उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय गांधी यांनी केले.

पुढे बोलताना अॅड. उपाध्याय म्हणाले की, भारत संविधानाने चालतो. संविधान दोन शब्दांनी बनातो म्हणजे सम विधान. परंतू दुर्दैवाने कोटजीवी, सत्ताजीवी आणि नोट जीवी नेत्यांनी संविधानाला लागूच केले नाही. भारतात संविधान नाही बहुविधान चालू आहे. हिंदूचे असे विधान, मुस्लिमांचे अलग विधान, पारशीचे अलग विधान, ईसाईंचे वेगळे विधान, याला संविधान म्हाणूत बाबीराचे तर बहुविधान आहे. डॉक्टरांचे निदान करून त्यावर औषधे देणे, वाहनचालकाचे काम आहे पूर्ण लक्ष रस्त्यावर देत वाहन सुरक्षितपणे चालवणे हे जसे त्यांचे काम आहे तसेच काम संसदेत संविधानाची शपथ घेणाऱ्या खासदार, आमदारांचे काम आहे, भारताच्या प्रत्येक कायद्याला सर्वोत्तम कायदा बनवणे. भारताच्या संविधानाची

 

शपथ घेणाऱ्या न्यायमूर्तीचे काम आहे. की लोकांना वेळेत न्याय मिळेल हे पाहणे. संविधानावर चर्चा तर खूप होते, काही लोक म्हणतात संविधान आम्ही वाचवू, इतक्या मोठ्या संविधानासोबत धोका केला आहे. भारतातील कोणत्याही समस्याच्या मूळापर्यंत जाल तर त्याचे मूळ कारण म्हणजे चुकीचे तयार र केलेले केलेले कायदे. कायदे ज्याला पार्लेमेंटमध्ये तयार केले गेले. १९४७ मध्ये अखंड भारताचे विभाजन कोणी केले, काँग्रेसने. वंदे मातरम् ला राष्ट्रगान काँग्रेसने होऊ दिले नाही. संस्कृतला राष्ट्रभाषा कोणी होऊ दिले नाही, डॉ. आंबेडकर यांचा राजानामा कोणी घेतला, लोहपुरूष सरदार पटेल यांना राजीनामा द्यायला कोणी भाग पाडले यासारख्या अनेक प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे काँग्रेस. काँग्रेसनेचे भगव्या ध्वजाला राष्ट्रीय ध्वजांचा दर्जा मिळू दिला नाही. कलम ३७० मुळे काश्मिरात

नरसंहार झाला. जो पर्यन्त हिन्दू बहुसंख्यक आहे तो पर्यंत या देशात संविधान राहील. जेथे हिन्दू ५० टक्के आहे तेथे मुस्लिम जज ही पोस्टिंग घेत नाही. केवळ हिन्दू विचार आहे सबका साथ सबका विकास.

मुघलांनी इस्लाम वाढवले, ब्रिटीशांनी ख्रिश्चन वाढवले. तर काँग्रेसने अर्ध्या भागात मुस्लिम तर अर्ध्या भागात ख्रिश्चन वाढवलेत. त्यांना अमर्याद अधिकार दिलेत. त्यामुळे हिंदू धोक्यात आले. काँग्रेसने काश्मिरमध्ये अब्दुलासोबत होत मिळविले भाजपनेही मेहबुबा यांच्यासोबत हातमिळवणी केली, पण तेथून कलम ३७० हटवले आणि तेथे भारताचे संविधान लागू केले, हे विसरून चालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता देशात एक देश एक संविधान लागू करण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन केले.

बांगला देशात सत्तांतर नव्हे तर हिंदूची कत्तलच
बांगला देशात सध्या जी अराजकता माजली आहे ती सत्तांतरासाठी नाही. सर्वो च्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या राजीनाम्यासाठी नाही तर केवळ आणि केवळ हिंदूची कत्तल करण्यासाठीच चालू आहे. कारण पंतप्रधानांनी राजीनामा दिला, न्यायमूर्तींनीराज राजीनामात दिला त्यामुळे अराजकता शांत व्हायला हवी होती, पण अजूनही सुरू आहे. त्यात केवळ हिंदूनाच लक्ष्य केले जात असल्याचेही ते म्हणाले.

घोषणांनी दणाणले नाट्यगृह
व्याख्यानाच्या प्रारंभी श्रोत्यांमधून वंदे मातरम्, भारत माता की जय, एक देश एक विधान माँग रहा है हिंदूस्थान, यासारख्या घोषणांनी नाट्यगृह दणादूण सोडले होते.

धुळ्यातील तीन हजार घरांवर वक्फ बोर्डाचा दावा माजी महापौर प्रदीप करपे
यावेळी बोलताना धुळ्याचे माजी महापौर प्रदीप करपे म्हणाले की, धुळ्यात ८० फुटी रस्ता म्हणून ओळख असलेल्या भागात त्यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार राहत आहेत. त्यांच्यासमवेत सुमारे तीन हजार २९८ घरे असलेल्या जागेवर अचानकपणे वक्फ बोडनि त्यांचा हक्क दाखवला आहे. ही जागा १८६७ मध्ये ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक काम करणाऱ्यांना ७५ एकर जागा इनाम म्हणून दिली होती. १९५५ मध्ये शासनाने धर्मदाय आयुक्त कार्यालयातून ही जागा एनए केली. त्याचा एक ट्रस्ट स्थापन करून त्या इसमाने त्यांचा मुलगा याचा कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राहील असे जाहिर करत ही जागा ९९ वर्षाच्या भाडे कराराने दिली. त्यानंतर १९६७ मध्ये या जागेवरर अनेकांनी घरे बांधली. २०१८ पर्यंत सर्व सुरळीत सुरू होते. लोक जागेची खरेदी विक्री करत होते. मात्र २०१८ मध्ये या सर्वाच्या घरांच्या सातबारा उताऱ्यावर मुस्लीम वक्फ बोर्डचि नाव लागले. या जागा खरेदी विक्री करण्यास मनाई करण्यात आली. येथे बांधकाम करण्यास मनपा परवानगी देत नाही. याविरोधात मी लढा देत असल्याचेही माजी महापौर प्रदीप करपे यांनी यावेळी सांगितले