---Advertisement---

मैत्रिणीची जीवघेणी भेट; गावकऱ्यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

by team
---Advertisement---

शिरपूर तालुक्यातील कालापाणी येथे एका तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला गावातील काहींनी अडवून बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकण्यात आला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या घरांवर हल्ला करत जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला.

काय घडले नेमके?

उमर्दा गावातील ओंकार रायमल पावरा १८) या तरुणाच्या तक्रारीनुसार, कमलसिंग उदयसिंग वसावे (२०), मंगेश उदयसिंग पावरा, कमलसिंग दारासिंग वसावे यांच्यासह चौघे जण बुधवारी मध्यरात्री ओंकारसोबत मैत्रिणीला भेटण्यासाठी कालापाणी येथे गेले होते. मात्र, गावातील सुरलाल मसान्या पावरा, बाज्या ऊर्फ बाजीराव दुध्या पावरा, भिका ऊर्फ भुरलाल दुध्या पावरा, रिंगण्या दुध्या पावरा, राज्या ऊर्फ राजेश दुध्या पावरा, खातरसिंग रेल्या पावरा, मिथुन कैलास पावरा या संशयितांनी त्यांना अडवले.

त्यानंतर लाठ्या-काठ्यांनी चौघांवर बेदम मारहाण करून डांबून ठेवले. यामध्ये कमलसिंग उदयसिंग वसावे गंभीर जखमी झाल्याने पहाटे त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर संशयितांनी कमलसिंगचा मृतदेह उचलून नाल्यात फेकला, तर इतर तिघांनाही मारहाण करून गावाबाहेर हाकलून लावले.

संतप्त ग्रामस्थांनी केलाआरोपींच्या घरांवर हल्ला 

ही माहिती उमर्दा गावात पोहोचताच ग्रामस्थ संतप्त झाले. गुरुवारी दुपारी शेकडो ग्रामस्थांनी कालापाणी येथे धाव घेतली व संशयित आरोपींच्या घरांना घेराव घातला. त्यांनी संशयित खातरसिंग पावरा यांच्या घरासमोर मृत कमलसिंगचा मृतदेह आणून अंत्यसंस्कार केले. त्यानंतर संतप्त जमावाने आरोपींच्या दोन घरांना आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संशयित आरोपींपैकी बाज्या ऊर्फ बाजीराव पावरा याला गुरुवारी अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment