चिमुरडीचा दुचाकीला लागला धक्का; त्याने केला कोयत्याने वार

मोहाडी येथे गुरुवारी दुपारी २ वाजता मराठी शाळेजवळ नऊ वर्षीय चिमुरडी  सिमरन हिचा एजाज अखिल खाटीक यांच्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला.या वादामध्ये एजाज अकिल खाटीक, तासिफ अकील खाटीक, रफिक हबीब खाटीक, अरमान हबीब खाटीक, तोहीप शरीफ खाटीक यांनी अमीन खाटीक यास धारदार कोयता डोक्याला मारून जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली.

जखमींना  पारोळा कुटीर रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले. व पुढल उपचारसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  या प्रकरणी शाहरुख अमीन खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाचही जणांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.