तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । नौदलाच्या नियमात मोठा बदल झाला आहे, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नौदलात महिलांचा समावेश केला आहे. अग्निवीर योजनेंतर्गत नौदलात 341 महिलांची भरती करण्यात आल्या आहे. महिला अधिकाऱ्यांनाही पुढील वर्षापासून नौदलात सामावून घेतले जाणार असल्याची माहिती नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत एकूण 3000 अग्निवीर नौदलात सामील झाले आहेत, अशा प्रकारे अग्निवीरांची पहिली तुकडी तयार करण्यात आली आहे, आता नौदलाच्या फक्त 8-8 शाखा नाही तर सर्व शाखा सर्वांसाठी खुल्या राहणार असल्याच त्यांनी सांगितल तसेच 2023 पर्यंत सर्व शाखांमध्ये महिला अधिकार्यांचा समावेश करण्याचा विचार करत आहोत. नौदल प्रमुखांनी सरकारला आश्वासन दिले आहे की ते 2047 पर्यंत ‘आत्मनिर्भर’ होईल, असंही ते म्हणाले
..आम्ही लक्ष ठेवून आहोत
हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या कारवायांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. गेल्या वर्षभरात भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावामुळे सागरी सुरक्षेला महत्त्व आले आहे.
चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत असल्याच त्यांनी सांगितल आहे. भारत 3 अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून 30 MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. हेलफायर क्षेपणास्त्र या ड्रोनद्वारेच प्रक्षेपित करण्यात आलेल आणि याच ड्रोनच्या मदतीने अल-कायदाचा दहशतवादी अल-जवाहिरीही मारला गेला.