खुशखबर ! महाराष्ट्रात सरकारी शाळांसाठी ९ हजार शिक्षकांची मेगाभरती

---Advertisement---

 

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण देण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका शाळांमध्ये सुमारे ९ हजार शिक्षकांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची कमतरता जाणवत होती. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असतानाही पुरेसे शिक्षक नसल्यामुळे अध्यापनावर परिणाम होत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनात आमदारांनी शिक्षक भरतीची मागणी लावून धरली होती.

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला असून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे २०२४-२५ आणि मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदेही या भरतीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

सध्या जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये सुमारे ५७०० पदे रिक्त असून ही पदे भरली जाणार आहेत. तसेच २५ मार्च २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे.

या प्रक्रियेत काही ठिकाणी शिक्षक जादा असल्याचे आढळून आले असून, पहिल्यांदाच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. या समायोजनानंतर रिक्त पदांपैकी सुमारे ८० टक्के पदे तातडीने भरली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य सरकारने सर्व संबंधित प्रशासनांना आदेश देत मे २०२६ पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या पदांचा संपूर्ण तपशील पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यास सांगितले आहे. यामुळे भरती प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत आणि नियुक्त्या वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---