हेरगिरी करणाऱ्या लष्करी जवानाला पंजाब पोलिसांकडून अटक

---Advertisement---

 

भारत-नेपाळ सीमेवरील मोतिहारी भागातील रक्सौल येथे पंजाब पोलिसांनी भारतीय लष्कराने फरार घोषित केलेला आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानाला अटक केली. त्याच्या ताब्यातून ५०० ग्रॅम हेरॉईन आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले. राजवीर सिंग उर्फ फौजी असे त्याचे नाव असून, त्याला फेब्रुवारी महिन्यात लष्कराने फरार घोषित केले होते.

२०२२ मध्ये, राजवीर इंटरनेटद्वारे पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर, तो नेपाळमध्ये लपून होता आणि तेथून पंजाब आणि नेपाळदरम्यान ड्रग्ज तस्करीचे नेटवर्क चालवत होता. एका पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, राजवीर देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.

भारत-नेपाळ सीमेवर शनिवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी जवान पाकिस्तानातील दहशतवादी आणि तस्करी नेटवर्कशी जोडला गेला होता. ड्रग्ज तस्करीच्या बदल्यात तो पाकिस्तानला भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील आणि गोपनीय माहिती पुरवत होता. पंजाब पोलिसांनी फाजिल्का जिल्ह्यातील कांशीराम कॉलनीतून त्याचा सहकारी चिराग यालाही अटक केली. त्याच्याकडून ९ मिमी पिस्तूल आणि ४०७ ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---