भडगाव : एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले. कोणास काही एक न सांगता मंदिरात जाऊन लग्न केले. धक्कादायक म्हणजे, अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला. या प्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून संशयीत अल्पवयीन मुलाविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारा १६ वर्षीय मुलाने पुणे जिल्ह्यातील एका गावात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत कोणास काही एक न सांगता एका मंदीरात जावून लग्न केले. मुलगी ही अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
यासंदर्भात भडगाव पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.