Savda Crime News : अल्पवयीन मुलीला फसवून केला लैंगिक अत्याचार ; दोघांना अटक

रावेर : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या ओळखीतील मुलांनी फूस लावत तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी २  संशयित व १  अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेतलं.

रावेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस तिच्या ओळखीतील मुलांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले. पथकात सपोनि विशाल पाटील, पोलिस उपनिरिक्षक अमोल गर्जे यांचा समावेश होता .  या पोलिस पथकाने गतीमान हालचाली करत अवघ्या तीन तासाच्या आत २ संशयित आरोपींना व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्यावर बाल लैंगिक संरक्षण कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपास करून संशयित अल्पवयीन आरोपीला बालन्यायालय व इतर दोन संशयित आरोपींना सत्र न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.