मुस्लिम ई-रिक्षा चालकाला महिलेने तिच्या खऱ्या भावा अगोदर बांधली राखी, कारण जाणून तुम्हीही म्हणाल वाह

आग्रा  :   येथे एका मुस्लिम ई-रिक्षा चालकाने प्रामाणिकपणाचे असे उदाहरण घालून दिले आहे, ज्याची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे. ग्वाल्हेर येथील महिला भावाला राखी बांधण्यासाठी आग्रा येथे आली होती. ती तिची बॅग ई-रिक्षात विसरली. ई-रिक्षा चालकाने बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली, त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन बॅग तिच्या ताब्यात दिली. बॅग मिळाल्यानंतर आनंदी झालेल्या महिलेने पोलिस ठाण्यात आपल्या खऱ्या भावा आगोदर समोर बॅग परत करणाऱ्या ई-रिक्षाचालकाला राखी बांधली. रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोची बरीच चर्चा होत आहे.

रविवारी संध्याकाळी आग्रा येथील अबरार अली या ई-रिक्षा चालकाने रकाबगंज पोलिसांना माहिती दिली की, ईदगाहपासून भगवान टॉकीजकडे एक महिला त्याच्या रिक्षात बसली होती. घाईघाईत त्याची बॅग रिक्षातच राहिली. महिलेचा खूप शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यावर चालक अबरार अलीने बॅग घेऊन रकाबगंज पोलिस ठाणे गाठले. ही महिला ग्वाल्हेरची रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तासाभरात महिलेचा घेतला शोध
रकाबगंज पोलिसांनी सोशल मीडिया आणि पोलिस ग्रुपच्या माध्यमातून अवघ्या तासाभरात महिलेचा माग काढला आणि तिला पोलिस ठाण्यात बोलावले. बॅग मिळाल्यानंतर महिलेला खूप आनंद झाला. या महिलेने सांगितले की, ती रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधणार होती. घाईघाईत बॅग ई-रिक्षात टाकली. बॅग मिळाल्यानंतर महिलेने आनंदाने अबरार अलीला राखी बांधली आणि 500 ​​रुपयेही दिले.

एसीपी सदर सुकन्या शर्मा सांगतात की, रक्षाबंधनासारख्या सणाच्या दिवशी एका मुस्लिम बांधवाने आपल्या हिंदू बहिणीच्या आनंदाची काळजी घेतली, त्याने हरवलेली बॅग पोलीस ठाण्यात महिलेला तातडीने परत केली. महिलेने आनंदी होऊन ई-रिक्षाचालक अबरार अलीला आपला भाऊ मानले आणि मनगटावर राखी बांधली. रकाबगंज पोलीस ठाण्यानेही या महिलेचा तात्काळ शोध घेतला, जे कौतुकास्पद आहे.