तरुण भारत लाईव्ह । २५ जानेवारी २०२३। जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ‘एकल देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि मराठी व हिंदी भाषेमध्ये देशभक्ती रसाने ओतप्रोत अशी विविध गीतं सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निलाश्री सहजे, हर्षदा उपसिनी व शीतल सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रम प्रमुख शुभदा नेवे यांनी स्पर्धेचे नियम सांगितल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. प्रथम गट ५ वी ते ७ वी आणि दुसरा गट ८ वी ते १० वी याप्रमाणे करण्यात आला होता. तब्बल २८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. मेरा देश मेरा मुल्क ,मेरा ये वतन, ए मेरे वतन के लोगो, कृत्वा नव दृढ संकल्प, वेदमंत्राहून आम्हा, तेरी मिट्टी मे मिल जावा, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, भारत की बेटी, जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया, साबरमती के संत अशी एकापेक्षा एक सरस गीत विद्यार्थ्यांनी सादर केली. या स्पर्धेमध्ये संगीत शिक्षक भूषण खैरनार यांनी विद्यार्थ्यांना संगीत साथ केली तर चिमुरड्या विद्यार्थ्यांनी ताल वाद्यांची साथ दिली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संहिता जोशी व आर्य कुलकर्णी या विद्यार्थीनि यांनी केले. सदर स्पर्धेचे परीक्षण हर्षदा उपसिनी व शीतल सोनावणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षकांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर निकाल घोषित केला.या स्पर्धेत लहान गटात काव्या शरद पवार या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच द्रुतीय क्रमांक वैष्णवी रितेश पवार या विद्यार्थिनीने मिळवला. तृतीय क्रमांक समीक्षा चौधरी आणि उत्तेजनार्थ चिराग जाधव याने मिळवला. तसेच मोठ्या गटात प्रथम क्रमांक नंदिनी किशोर शिंदे, द्रुतीय क्रमांक आर्य प्रवीण कुलकर्णी, उत्तेजनार्थ सायली संतोष पाटील या विद्यार्थिनीने मिळवला. विद्यार्थ्यांना माध्यमिक विभागाचे समन्वयक श्री. गणेश लोखंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील व माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.