---Advertisement---
जळगाव : एमआयडीसीत कंपनीच्या भिंतीला अचानक उंचीवरुन लोखंडी बीड धातुचा तुकडा आदळल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील अनुपमा इंडस्ट्रीज सेक्टर दहा याठिकाणी समोर आला.
घटना कळताच प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकार जाणून घेतला.
सुमारे वीस किलो वजनाचा हा तुकडा आहे. पोलिसांनी तो ताब्यात घेतला. हा तुकडा कोठुन कसा आला, या अनुषंगाने शोध घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. तुकडा पडल्यानंतर कामगार यांच्यासह परिसरात चर्चेला उधान आले होते.
शॉप फोडून दारूच्या बाटल्या, रोकड घेत चोरटे पसार
जळगाव : दुकानाची खिडकी फोडुन दारुच्या बाटल्या तसेच रोकड असा सुमारे ४१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना राष्ट्रीय महामार्गलगत आकाशवाणी चौक ते ईच्छादेववी चौक जवळ अशोका लिकर गॅलरी याठिकाणी घडली. बुधवारी २ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
दीपक बाळकृष्ण भंगाळे (वय ३८, रा. हनुमाननगर भुसावळ) हे व्यावसायिक असून त्यांचे वाईन शॉप आहे. नेहमीप्रमाणे ते बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेऊन तपासाला गती देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे तपास करीत आहेत.