मुंबईत अचानक विमान कोसळलं, अपघातानंतर झाले दोन तुकडे

मुंबई : विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळलं. या प्लेनमध्ये सहा जण होते. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याची माहिती असून त्यानंतर विमानाला मोठी आग लागली होती. एअरपोर्टवरील यंत्रणांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

VSR Ventures Learjet 45 विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईला आलेलं होतं. धावपट्टी 27 वर उतरत असताना विमानाचा अपघात झाला. यामध्ये विमानात ६ प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. या अपघातामध्ये जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

विशेष म्हणजे विमान कोसळल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले. त्यानंतर मोठी आग लागली. खराब हवामानामुळे विमानाला अपघात झाला आहे. ‘डीजीसीए’ने यासंदर्भातील माहिती दिलेली आहे.

नेमकी दुर्घटना कशी झाली
हे खासगी विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईकडे येत होतं. मुंबईत सुरु असलेल्या तुफान पावसामुळे सध्या खराब हवामान आहे. विमानाचं जेव्हा लँडिंग होत होतं, त्यावेळी विमान नियंत्रणाबाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हे खासगी विमान कोसळलं आणि भीषण दुर्घटना घडली.