नंदुरबार : खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नातून पोलिसांचे वाहन समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली. यामध्ये पोलीस निरीक्षकासह तीन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी अपघातात वाढ झाली असून आता चक्क पोलिसांच्याच वाहनाला अपघात होत आहेत त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळोदाहुन नंदूरबारच्या दिशेने पोलीस वाहन येत होते. त्याचदरम्यान, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नातून समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. नेत्रग-शेवाळे राष्ट्रीय महामार्गावर सुदर्शन पेट्रोल पपंजवळ हा अपघात झाला. यामध्ये पोलीस निरीक्षक भावसार आणि त्याचा सोबत असलेलं 3 कर्मचारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील 2 राज्यांना जोडणारा नेत्रंग-शेवाडे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्या सोतच अवैद्यरित्या रेती वाहतूक करण्याऱ्या अवजड वाहनांमुळे या ठिकाणी दिवसेंदिवस मोठ्या अपघाताचे प्रमाण हे वाढत आहेत.