Jalgaon Accident : घरी पोहोचण्याआधीच मृत्यूनं गाठलं; दुर्दैवी घटनेत होतकरू तरुणाचा अंत

---Advertisement---

 

Jalgaon Accident : जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अर्थात एका २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित तरुणाला घरी पोहोचण्याच्या अवघ्या अंतरावर मृत्यनं गाठलं. सुनील उत्तम सोनार (वय २६) असे मयताचे नाव असून, या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

पाचोराच्या कृष्णापुरी भागात राहणारा सुनील सोनार हा चहाची टपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दररोज प्रमाणे १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तो चहाची टपरी बंद करून आपल्या दुचाकीने घरी कृष्णापुरी येथे परत जात होता.

जारगाव चौफुलीजवळ पोहोचताच, एका अज्ञात आयशर वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सुनील गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शवविच्छेदन उपचारादरम्यानच १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता सुनीलचा मृत्यू झाला. सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मयत सुनील यावर पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत सुनीलच्या पश्चात आई, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभअसलेल्या मुलाच्या अकाली निधनाने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---