जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समितीतर्फे २५-२६ सप्टेंबर रोजी वीज कंपन्यातील एक लाख कर्मचारी अभियंते यांचा ४८ तासांचा संप पुकारण्यात येणार आहे. या अनुषंगाने कृती समिती जळगाव परिमंडळ शाखेच्या वतीने आज गुरुवार, १९ रोजी दुपारी परिमंडळ कार्यालयासमोर द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आले.
अशा आहेत मागण्या
वीज कर्मचाऱ्यांचे पेन्शन लागू करा, तेरा जलविद्युत प्रकल्प खाजगीकरण करण्यात तीव्र विरोध, महापारेषण कंपनीतील रुपये २०० कोटी चे वरील प्रकल्प खाजगी भांडवलदारांना देण्यास तीव्र विरोध, स्मार्ट प्रीपेड मीटर केंद्र सरकारच्या धोरण व सरकार करत असलेल्या अंमलबजावणीला विरोध, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करून ६० वर्षांपर्यंत रोजगाराची हमी देत टप्प्याटप्प्याने कायम करण्यात यावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावे. या प्रमुख पाच मागणीसाठी क्रमबध्द आंदोलन दुसरा टप्प्यात निषेध द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आली.
कृती समितीचे वतीने कॉ.विरेंद्रसिंग पाटील, संयुक्त सचिव वर्कर्स फेडरेशन ज्ञानेश्वर पाटील, भेरूलाल पाटील ,आर. आर. सावकारे, आर. आर. पाटील, चेतन तायडे, श्री चौधरी, मोहन गारूंगे या संघटना प्रतिनिधी सर्वांनी शासन व प्रशासनाच्या कामगार विरोधी तसेच जनताभिमुख उद्योग खाजगीकरण धोरणाचा तीव्र निषेध नोंदविला व आगामी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा व निर्धार केला आहे.
आजच्या टप्प्यात १९ सप्टेंबर रोजी निषेध द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आले. प्रशासन व शासन सकारात्मक न झाल्यास २५ व २६ सप्टेंबर रोजी ४८ तासांचा संप पुकारला आहे. तरीही प्रशासन अनुकूल झाले नाही तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.