Jalgaon City Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : आ. राजूमामा भोळे यांनी घेतली 74 हजारांची आघाडी

जळगाव शहर विधानसभा मतदार संघांत महायुतीचे आमदार सुरेश भोळे यांनी निर्णयाक आघाडी घेतली आहे. आ. भोळे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत . त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

सुरेश भोळे हे सलग तिसऱ्यांदा आमदार होत आहेत. आ. भोळे यांचे भारतीय जनता पक्ष कार्यलयात जोशात स्वागत करण्यात आले. आ. भोळे यांचे पक्ष कार्यालयात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात यांचे स्वागत करण्यात आले. पंधराव्या फेरीत आ . भोळे यांना 74 हजार 833 मतांची लीड मिळाली आहे. एकूण १९ फेऱ्या होणार असून आता केवळ ४ फेऱ्या शिल्लक आहेत. त्यांच्या विरोधात महा विकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन ह्या लढत देत आहेत.

दरम्यान, आमदार भोळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी २५ वर्षांपासून राजकारणात असून मागील १० वर्षांपासून आमदार म्हणून काम करत आहे. या दहा वर्षांत १०० टक्के कामे झाल्याचा आम्ही दावा केलेला नाही. ७५ टक्के कामे झाले असून २५ टक्के कामे ही प्रगतीपथावर आहेत. जनतेला आम्हाला पुन्हा सेवा करण्याची संधी यामुळे त्यांचे मी आभारी आहे.