---Advertisement---

लग्नाच्या वचनाने तरुणीसोबत संबंध; त्याला आधीच सहा अपत्य, तरुणीनेही तीन मुलांना जन्म दिला..

by team
---Advertisement---

चोपडा : तालुक्यात एक धक्कादाक प्रकार समोर आला आहे. पहिल्या पत्नीपासून ६ अपत्य झाली. त्यानंतरही एका २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळेवेळी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे पाच वर्षाच्या काळात पीडितेने देखील तीन मुलांना जन्म दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी बुधवारी न्यायालयाच्या आदेशान्वये ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रानुसार, चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणाचे आधीच लग्न झालेले होते. पहिल्या पत्नीपासून त्याला सहा अपत्य होती. तरी देखील त्याने एका २९ वर्षीय तरुणीला २०१६ ते २०२१ या काळात वेळेवेळी लग्नाचे आमिष देत तिच्यावर अत्याचार केले. या पाच वर्षांच्या अत्याचारातून पीडितेला देखील ३ मुलं झाली आहेत. आपली दिशाभूल करुन षडयंत्र, कटकारस्थान रचून हे सगळे केले गेल्याच लक्षात आल्यावर तरुणीला मोठा धक्का बसला.

एवढेच नव्हे तर तरुणाच्या घरातील इतर सदस्यांनी पीडितेला घरातून माहेरी हाकलून देत तिची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. तरुणीने याप्रकरणी न्यायालयात तक्रार केली. त्यानुसार या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये बुधवारी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment