---Advertisement---
सोयगाव : सोयगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्ताने पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विठ्ठल रुखमणीच्या वेषातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या दिंडीत वारकऱ्यांच्या वेषात विठ्ठलाच्या नामघोषात विद्यार्थी सहभागी झाले होते.
बालवारकऱ्यानी शाळेपासून ते विठ्ठल रूख्मिणी मंदीर आमखेडापर्यत पायी दिंडी काढण्यात आली. ही दिंडी सोयगाव गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे व केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बाल वारकऱ्यांनी अभंग गाऊन संपूर्ण परीसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. यावेळी रुद्र शरद पवार या विद्यार्थ्याने विठ्ठलाची तर डिंपल अनिल ठोंबरे या विद्यार्थीनीने रुख्मिणी मातेची सुंदर अशी वेशभुषा केली होती.
---Advertisement---
इतर विद्यार्थी,विद्यार्थीनीनी वारकऱ्यांची वेशभुषा केली होती. जणूकाही “विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकतांना तहान भूक हरली या अभंगा प्रमाणे” जिल्हा परीषद प्राथमिक रामजीनगर शाळेत बालवारकऱ्यांची विठ्ठल नामांचीच शाळा भरली होती. बालवारकरी विठ्ठल नामात रंगुन गेले होते. यावेळी अगस्तमुनी वारकरी संस्थेतील हभप शरद महाराज पवार यांचे व त्यांच्या विद्यार्थ्याचे अनमोल सहकार्य लाभले. दिंडीमध्ये बालवारकरी यांनी सुंदर अशा फुगड्या खेळण्याचा आनंदही घेतला.
यस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा वैशाली पवार, सदस्या मनिषा जेठे, पालक प्रवीण जाधव, शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, सहशिक्षक गोपाल चौधरी, प्रशिक्षक शिक्षक शुभम देसले यांनी परिश्रम घेतले.