Nandurbar Accident News : शेळीला वाचविण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाचा नदीत बुडून मृत्यू

नंदुरबार : एक मेंढपाळ नदीत गेलेल्या शेळीला वाचविण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना शहादा तालुक्यातील अवघे गावाजवळ घडली. भावड्या भिल असे घटनेत मृत झालेल्या मेंढपाळांचे नाव आहे.

शनिवार १४ सप्टेंबर रोजी भावड्या भिल हा मेंढपाळ दुपारच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेला होता. कान्हेरी नदी काठा जवळ  शेळी चारत असताना ती पाणी पिण्यास नदीत उतरली. परंतु, ती शेळी पाण्यात बुडत असल्याचे मेंढपाळच्या लक्षात आले. यानंतर शेळीला बाहेर काढण्यासाठी भावड्या भिल हा नदीत उतरला.  मात्र, त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने नदीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजेपासून प्रकाशा येथील पट्टीचे पोहणारे युवकांनी नदीत भावड्याचा शोध घेतला. चार तासांचा प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरुन पावसाळ्यापूर्वी रस्ता भराव कामाकरीता जेसीबी लावून नदीतील पिवळी मातीचा उपसा करण्यात आला होता. सुमारे पाचशे मीटर लांबीचा पंचवीस तीस फुट खोल खड्डा झाल्याने नदीला यावर्षी पुर आल्याने मेंढपाळ या नदीचे खोलीकरण अंदाज आला नसल्याने मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.