भरधाव डंपरची धडक; एसटी कर्मचाऱ्याने जीव गमावला!

जामनेर : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एसटी कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जामनेरात घडली. निलेश नामदेव बडगुजर ( वय ३२, रा. पाळधी, ता. जामनेर ) यांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील वाकी रोडवरील हरिओम नगर जवळ. गुरुवारी, रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एसटी कर्मचारी निलेश नामदेव बडगुजर व मित्र नितीन माधव सोनवणे हे दुचाकी वर जात होते. दरम्यान, जामनेरकडे येणार्‍या डंपर वाहनाने समोरून धडक दिल्यामुळे निलेश नामदेव बडगुजर रा. पाळधी हल्ली मुक्काम जामनेर याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून नितीन सोनवणे हे जखमी झाले आहेत.

जखमीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मयत निलेश बडगुजर हे जामनेर एसटी डेपो क्लर्क या पदावर कार्यरत होते. सदर घटनेची माहिती मिळताच जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये मित्र व नातेवाईकांनी टाहो फोडला. निलेश यांच्या पक्षात पत्नी व एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे.