जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये दुसऱ्या वर्षाला एसवायबीएच्या विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत जय श्रीराम असे लिहील्याने त्यास नापास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये एस. वाय. बी. ए.च्या विद्यार्थ्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात येऊन उप महानगर अध्यक्ष आशिष सपकाळे यांना अचंबित करणारी नोटीस दाखवली. त्याने सर्व विषयांचे उत्तर पत्रिकामध्ये उत्तर बरोबर लिहिले आणि काही तीन ते चार उत्तर पत्रिकेत जय श्रीराम असे लिहिलं आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत या विद्यार्थ्याला नापास करण्यात आलं. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. हिंदुस्थानाचे दैवत आणि ज्या भारतात श्रीरामाला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यांचं नाव लिहिल्यामुळे विद्यार्थ्याला फेल करण्यात आलं. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असल्याचे मत आशिष सपकाळे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या विद्यार्थ्याला जर न्याय मिळाला नाही तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे जाऊन तीव्र आंदोलन छेडणार आहे. परीक्षेमध्ये येणाऱ्या विद्यार्थी तोंड झाकून बुरखा घालून येणारी विद्यार्थिनी त्यांचा चेहरा दिसत नाही अशा विद्यार्थी विद्यालयाला चालतात आणि फक्त जय श्रीराम लिहिलं म्हणून तुम्ही त्यांना गैरप्रकार हा शब्द म्हणतात. जर त्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना याविरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा आशिष सपकाळे यांनी दिली आहे.