---Advertisement---
चाळीसगाव : शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगळवारी मोकाट जनावराने एका दोन वर्षीय बालिकेवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका मोटरसायलस्वाराने प्रसंगावधान दाखविल्याने त्या बालिकेचे प्राण वाचले आहेत. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. नगरपालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
चाळीसगाव शहरातील धुळे रोड तेजस कोणार्क परिसरात मंगळवार (8 जुलै) रोजी संध्याकाळी 5 ते 5.30 वाजेच्या सुमारास दुर्घटना टळली. शिक्षक कॉलनी जवळ कार्तिक राठोड (वय 2 वर्ष) व पल्लवी राठोड (वय 7 वर्ष) हे दोघे अंगणांत खेळत होते. यावेळी मोकाट फिरणारी एक गाईने कार्तिक या बालकावर अचानक हल्ला चढविला. यावेळी शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वाराने ही घटना बघितली. त्याने लागलीच आपली गाडी बाजूला टाकून त्या बाळाला उचलले. त्यानंतर त्या मोकाट गाईने पल्लवीवर देखील हल्ला केला. त्यावेळी परिसरातील नागरिक यांनी बाळाला वाचवले ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
---Advertisement---
ही घटना सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात व शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाळीसगाव शहरात तसेच शहरा बाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर देखील या मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा येत आहे. ही मोकाट जनावरे अनेकांची पाळलेली आहेत व त्यांना सकाळी बिनधास्तपणे मोकळे सोडून दिले जाते. हि जनावरे रात्री आपल्या मुळमालकाकडे जातात. यात बरीचसी जनावरे ही मोकाटच आहेत. या दोन्ही प्रकारच्या गुरांवर कलम 163 अथवा 335 कलमान्वये मोकाट गुरे पकडण्याचा व या गुरांच्या मालकांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. अशा या बिनधास्त फिरणाऱ्या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून तसेच चाळीसगाव शहरातून मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली आहे.