क्लासेसहून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले

सोयगाव : क्लासेस हून घरी परतताना ट्रक खाली चिरडून एक १५ वर्षीय विद्यार्थी सिल्लोड येथे ठार झाला. महेश कौतिकराव ताजने (वय. १५) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. आज सकाळी ९ वाजनेच्या सुमारास शहरातील औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील शिवसेना भवन समोर हा अपघात घडला.

शहरातील श्री म्हसोबा महाराज मंदिर परीसरातील माऊली नगर येथील रहिवाशी कौतिक ताजने यांचा मुलगा महेश हा दैनंदिनी सकाळी सहा वाजता आपल्या जवळील मोटारसायकल क्र एम.एच.२०बी.बी.१२३४ वरून एका खाजगी क्लासेसला जात असे तर आज मंगळवारी सकाळी महेश आपल्या नेहमी प्रमाणे क्लासेस आटोपून घराकडे येत असताना सिल्लोड-जळगाव महामार्गावरील शिवसेना भवन समोर अचानक समोरून भरधाव वेगाने एका आयशरट्रक आणि महेशच्या मोटर सायकलचा अपघात झाला. या अपघातात महेश हा विध्यार्थी जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ट्रक ताब्यात घेतले. शवविच्छेदन प्रक्रिये नंतर महेश वर शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूल जवळील स्मशानभूमीत अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यार्थ्यांना अश्रू अनावर
महेश हा शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये इयत्ता ९ वी वर्गात शिकत होता. शाळेजवळील स्मशानभूमीत त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, त्याच्या अंतिम संस्कार कार्यक्रमात महेश चे शिक्षक व त्याच्या वर्गातील मित्र देखील उपस्थित होते. आपला मित्र या जगात राहिला नाही हे पाहून विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.

महेश चे वडील कौतीक ताजने हे रोज मजुरी करीत होते. मुलगा शिक्षणात हुशार होता. त्याला शिकविण्यासाठी कौतिक ताजने यांनी खाजगी क्लासेल लावून दिले होते. ताजने यांना मयत महेश च्या पच्शात एक मुलगी असून ती १२ वी वर्गात आहे.