एरंडोल विधानसभेसाठी ए.टी. नानांनी कसली कंबर !

जळगाव : एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, आपण अन्य कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठी उमेद्वारी पक्षाकडे मागणार असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात इच्छूकांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. युती आघाडीकडून बैठकांचे सत्र सुरू आहे, तर काही राजकीय पक्षांनी नुकत्याच इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. ही निवडणूक युती-विरुद्ध आघाडी अशी होणार हे तूर्तास नक्की आहे. त्यादृष्टीने इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच प्रस्तापितांना किंवा विद्यमान आमदारांना बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागेल असे दिसत आहे.

एरंडोल-पारोळ्यासाठी चुरस

जळगाव लोकसभा मतदारसंघातील एरंडोल विधानसभा मतदारसंघ मोठा आहे. यात ज्या पक्षाचा उमेदवार असेल तो पारोळ्यातील असेच अशीच परिस्थिती सध्या आहे. पारोळ्यातून शिवसेनेचे (शिंदे गट) चिमणराव पाटील हे आमदार आहेत. युतीकडून ही जागा शिवसेनेकडे असली तरी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी माजी खासदार ए.टी. नाना पाटील यांनी सुरू केली असून, त्यांनी याबाबत नुकतीच माहितीही दिली.

मतदारसंघातील एरंडोल विधानसभा मतदारसंघ मोठा आहे. यात ज्या पक्षाचा उमेदवार असेल तो पारोळ्यातील असेच अशीच परिस्थिती सध्या आहे. पारोळ्यातून शिवसेनेचे (शिंदे गट) चिमणराव पाटील हे आमदार आहेत. युतीकडून ही जागा शिवसेनेकडे असली तरी या मतदारसंघातून निवडणूक युतीत आगामी काळात एका एका जागेचे महत्त्व आहे, हे लक्षात घेऊनच आपण निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे सांगितले. ए. टी. पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र आता त्यांनी एरंडोल लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

आघाडीत बेबनाव

आघाडीकडून माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील यांना मागील वेळी पराभवाला सामोरे जावे लागले होते. तरीही त्यांनी यावेळी निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र शिवसेना उद्धव गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने यांनीही ही निवडणूक आपण लढविणार असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे युती-आघाडीत या परिस्थितीमुळे बेबनाव निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संबंधित इच्छुकांनी गाठीभेटींना सुरूवात केल्याने काही जण अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. येत्या ९ तारखेला ए.टी. नाना काय भूमिका जाहीर करतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.