तरुण भारत लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२२ । दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर आणखी दोन पोलिसांत गुन्हे दाखल आहेत.
दिपक भास्कर सपकाळे (वय २७, रा. धामणगांव ता.जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव तालुका पोलिसांत सदरचा गुन्हा दाखल होता, या गुन्ह्यातील एका आरोपीला आधीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना, अटक आरोपीचा साथीदार दिपक भास्कर सपकाळे (वय २७, रा. धामणगांव ता.जि.जळगाव) हा त्याचे राहते गावी धामणगांव येथे आला असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यानुसार पोहेकॉ / विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना/ नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, विजय पाटील, अविनाश देवरे, या पथकांना रवाना केले असता आरोपीतास ताब्यात घेवुन जळगांव तालुका पोस्टे यांचे ताब्यात दिले आहे. दरम्यान, सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द यापुर्वी १) जळगाव शहर पोस्टे गुरनं २३६ / २०२० २) जळगांव तालुका पोस्टे गुरनं २९७/२०२१ असे मो.सा चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे कळते.