जळगाव : काल देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला निधीची तरतूद न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महानगरतर्फे गांधी उद्यान येथे ‘गाजर’ दाखवा आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, २४ रोजी करण्यात आले.
केंद्रीय अर्थसंकल्पात जाहिरातीसाठी होणाऱ्या विविध योजना आहेत पण महाराष्ट्रासाठी काही ठोस निधी सोडा पण इतर राज्यांप्रमाणे थोडेफार निधी देण्यात आलेला नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे करण्यात आला. आंध्र प्रदेश व देशातील इतर राज्यांना दिलेल्या मदतिची तुलना केली असता महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही. महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावरील अन्याय सहन करणार नाही. राज्यातील जनतेच्या मनातले रोष आणि भावना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध नोंदवण्यात आला. निषेध नोंदवण्या अगोदर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात विविध घोषणा देऊन व गाजर दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महानगर युवक जिल्हाअघ्यक्ष रिकू चौधरी, राष्ट्रवादी महिला आघाडी महानगर जिल्हाअघ्यक्ष मंगला पाटील , जिल्हा समन्वयक विकास पवार, महानगर जिल्हाउपअघ्यक्ष किरण राजपूत, शहर संघटक राजु मोरे, राष्ट्रवादी आदिवासी सेल जिल्हाअघ्यक्ष इब्राहिम तडवी, महानगर जिल्हाउपंअध्यक्ष डॉ. संग्रामसिंह सुर्यवंशी, महानगर जिल्हासरचिटणीस रहिम तडवी , सुहास (गोटू) चौधरी, चेतन पवार, आकाश हिवाळे, समाजिक न्याय उपंअध्यक्ष भाऊराव इंगळे, वर्षा राजपूत, कला शिससाट, लिला रायगडे, राहुल टोके, राजु बाविस्कर, गौरव वाणी, योगेश साळी, मतिन सैय्यद, अकिल खान, महाडिक सर आदी पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.