अमोल पुसदकर
तरुण भारत न्यूज : नुकतीच एका तरुण परिचित अभियंत्याच्या मृत्यूची बातमी समजली. त्याला लठ्ठ पगाराची नोकरी होती. मोठे पद होते. कुठलाही शारीरिक आजार नव्हता. तरीसुद्धा अकस्मात हृदयविकाराच्या तीव‘ धक्क्याने त्याचे निधन झाले. तसे पाहता त्याला मृत्यूच्या आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच छातीत दुखणे सुरू झाले होते. तरीसुद्धा मी फिट आहे, तंदुरुस्त आहे. माझे छातीचे दुखणे हे अन्य काही असेल असे समजून त्याने डॉक्टरकडे जाण्याचे नाकारले. रात्री उशिरा जवळच्या डॉक्टरकडे गेल्यावर सुद्धा डॉक्टरनेही त्याला तपासून मामुली औषध उपचार करून सुटी दिली. रात्रभर त्याच्या छातीचे दुखणे सुरूच होते. तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले व सकाळी डॉक्टरकडे जाऊ म्हणता म्हणता शेवटी तो घरीच कोसळला व हृदयविकाराच्या तीव‘ धक्क्याने त्याचे निधन झाले. आजकाल छातीत डाव्या बाजूला जर दुखत असेल तर लोकांना एवढे ज्ञान झाले आहे की हृदयाशी संबंधित डॉक्टरकडे गेले पाहिजे. इतके सामान्य ज्ञान त्यालाही निश्चितपणे हो जवळपास१४ तासांचा वेळ त्याला स्वत:वर उपचार करण्याकरिता मिळाला होता. तरीही अशा प्रकारची बुद्धी होऊ नये. घरच्यांनी सुद्धा तो नाही म्हणत आहे म्हणून त्याला घेऊन जाऊ नये याला काय म्हणावे? काळगतीच म्हटले पाहिजे.
आजकाल खाजगी नोकर्या या प्रचंड तणावाच्या झालेल्या आहेत. खाजगी क्षेत्रातही राजकारणाने प्रवेश केलेला आहे. लोक नोकरीला आपले सर्वस्व मानून बसतात. तेथील आनंदाचे प्रसंग म्हणजेच आनंद आहे व तेथील दुःख म्हणजेच दुःख आहे असे ते समजू लागतात. सातत्याने कोणत्या ना कोणत्या लक्ष्याचा पाठपुरावा त्यांना करीत राहावा लागतो. कामाच्या ठिकाणी निर्माण होणारा ताणतणाव त्यांचे जीवन व्यापून टाकतो. वरवर पाहता त्यांना कोणतीही शारीरिक व्याधी नसते. परंतु हे मानसिक त्रासच रक्तदाब, मधुमेह व हृदयविकार यांना आमंत्रित करीत राहतात. कमी वयात मृत्यू पावलेल्या या लोकांच्या जीवनशैलीचा, दिनचर्येचा, त्यांच्या ताणतणावांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. लाखो रुपयांच्या नोकर्या या त्या बदल्यांमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे रोग देत असतात. काही लोक नोकरी ही गुलामांसारखी करीत असतात.
म्हणजे कोणीही काहीही बोलले तर ऐकून घेणे, पण त्याला प्रत्युत्तर न देणे. अनेक वेळा आपले बरोबर असून सुद्धा दुसर्याचे ऐकून घेणे व आपण चूप राहणे या सततच्या ऐकण्यामुळे सुद्धा भावनांचा कोंडमारा होतो. आतल्या आत त्या भावना दाबल्या गेल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रोग उत्पन्न होऊ शकतात. मानसिक ताण वाढू शकतो.या मानसिक ताणतणावाचे नियोजन आपण शिकले पाहिजे. नोकरी म्हणजे सर्वस्व नाही. व्यवसाय म्हणजे सर्वस्व नाही. यातील यश- अपयश म्हणजे जीवन नाही. जीवन यापेक्षा मोठे आहे. घरदार, जमीन जुमला, लाखो रुपयांचे बँक बॅलन्स, पॉलिसीज या सर्व वस्तू आपण इतरांकरिता उपभोग घेण्यासाठी सोडून देत असतो. परंतु त्या वस्तूंपेक्षाही आपल्या घरच्यांना आपली आवश्यकता आहे. आपल्या मुलाबाळांना, आई-वडिलांना आपली आवश्यकता आपल्या पैशांपेक्षा जास्त आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपण आपली काहीतरी दिनचर्या बनविली पाहिजे. योग प्राणायाम, व्यायाम यांचा आपल्या जीवनामध्ये, दिनचर्येमध्ये अंतर्भाव केला पाहिजे. तरुण वयात अत्यंत यशस्वी कारकीर्द असताना सुद्धा जगाचा तडकाफडकी निरोप घेणार्या अशा या तरुण लोकांचे मृत्यू अंतर्मुख करतात. विचार करायला भाग पाडतात.
समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचा मलबा पाहण्यासाठी एकाने पाणबुडीतून सहल आयोजित केली. कोट्यवधी रुपयांचे तिकीट काढून चार प्रवासी, जे स्वतः अब्जोपती होते, या सहलीमध्ये सहभागी झाले. समुद्रामध्ये ती पाणबुडी भरकटली. तिचा कंट्रोल रूमशी असलेला संबंध तुटला. ती समुद्रात भरकटायला लागली.
तिच्यावरील ऑक्सिजन सुद्धा संपत आलेला होता. एके ठिकाणी त्या पाणबुडीचा स्फोट झाला व आतील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. बि‘टनमध्ये राहणारे एवढ्या दूर समुद्रात कशाला जातील तर नियतीने सहलीचे निमित्त त्यांना काढून दिले. कोट्यवधी रुपयांचे तिकीट सुद्धा त्यांना सहलीमध्ये सहभागी होण्यापासून रोखू शकले नाही. एवढ्या खोलवर समुद्रात ते कसे जातील, तर पाणबुडीने. ती व्यवस्था पण करून दिली. काळाने आपले पाश टाकले व त्यांना खेचत खोलवर समुद्रात घेऊन गेला. हे लोक सुद्धा इतरांकरिता अब्जो रुपयाची संपत्ती सोडून गेलेले आहेत. पण आज ते स्वतः मात्र नाहीत. राजाचा एक पोपट होता.