नवी दिल्ली : प्रत्येक जीव जीवनसाथी शोधत असतो आणि त्यासाठी तो अडचणीही सहन करतो, प्रियकराला भेटण्याकरिता लांबचा प्रवास देखील करतो. अशीच एक आश्चर्यकारक नर व्हेल माश्याची कथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नर व्हेलने प्रेमाच्या शोधात प्रशांत महासागरातून हिंदी महासागरापर्यंत ८,१०६ मैल पर्यंतचा प्रवास केला.
शास्त्रज्ञांच्या मते, या व्हेलने सर्वांत लांब महा-वर्तुळ अंतर कापले आहे. पोट-वर्तुळ अंतर हा पृथ्वीच्या गोलाकार पृष्ठभागावरील दोन बिंदूमधील सर्वांत लहान मार्ग आहे. नर हंपबैक व्हेलचा अभ्यास करणाऱ्या टीममधील शास्त्रज्ञ टेड चीझमन यांनी सांगितले की, या सहलीचा उद्देश केवळ स्वतःसाठी योग्य मादी शोधणे हा आहे. तो प्रथम कोलंबियापासून पूर्वेकडे गेला आणि नंतर दक्षिण महासागराकडे गेला.
यापूर्वी १९९९ ते २००१ दरम्यान एका मादी हंपबैक व्हेलने ब्राझील ते मैडागास्कर हे ९८०० किलोमीटरचे अंतर कापले होते. या व्हेलने केवळ कोलंबियाच्या किनाऱ्यापासून झांझिबारच्या किनाऱ्यापर्यंत विलक्षण अंतर प्रवासच केला नाही, तर वाटेत हंपबैक व्हेल गटांनाही भेट दिली, जो या प्रजातीसाठी एक नवीन आणि महत्त्वाचा शोध असल्याचे सिद्ध होते.
२०१३ ते २०२२ दरम्यान घेतलेल्या छायाचित्रांद्वारे हा आश्चर्यकारक शोध लावला गेला, ज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी व्हेल दिसली. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२२ रोजी हिंद महासागराच्या जांजीबार वाहिनीवर दिसला, या प्रजातीने सर्वांत जास्त अंतर कापण्याचा नवीन विक्रम केला आहे. या व्हेलने १३ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास पूर्ण केला.