अहमदाबाद : गुजरात येथील अहमदाबाद येथे गेल्या २० वर्षांपासून राहणाऱ्या ५६ पाकिस्तानातील भारतीय वंशीयांना भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायद्यामुळे (CAA) भारतीय नागरिक म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला. या एकूण ५६ नागरिकांमध्ये प्रमुख नाव हिशा कुमारीचे आहे. १९९८ मध्ये पाकिस्तानात हिशाचा जन्म झाला होता. तिने भारतात वैद्यकीय शिक्षण घेत पदवी संपादन केली आहे.
२०१३ मध्ये ती आपल्या कुटुंबासह भारतात आली आणि इयत्ता ८ वी पासून तिने इथेच शिक्षण घेतले. त्यानंतर २०१७ वर्षात तिला अजमेरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे आणि तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ११ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान गृह राज्यमंत्री हर्श संघवी यांनी स्वत: त्यांना नागरिकत्व प्रमाणपत्र सुपूर्द केले. यावेळी, गृह राज्यमंत्र्यांनी सर्व नवनिर्वाचित भारतीय नागरिकांचे अभिनंदन केले आणि म्हणाले की, आता तुम्ही भारत देशाचे नागरिक आहात.
भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर हिशाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, “मला माझी ओळख पुन्हा एकदा परत केल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्ग मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे मी आभार मानते. हे नागरिकत्व मिळाल्यानंतर मी कुठेही अर्ज करू शकते. नागरिकत्व मिळाल्याचे प्रमाणपत्र तिला मिळाले आहे. भारताचे नागरिकत्व मिळाल्याचा मिळाल्याचा अभिमान वाटत”, असल्याचे सांगितले जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे २०२१७ ते मार्च २०२४ दरम्यान, मोदी सरकाराने १९६७ साली पाकिस्तानातील नागरिकांना भारतीयांना नागरिकत्व प्रमाणपत्र दिले असून या ५५ लोकांसह ही संख्या आचा १२२२ वर पोहोचली आहे ही बाब भारताच्या दृष्टीने आनंदाची आहे. याआधीही लोकांना दिल्ली येथे जाऊन अवघड स्थितीचा सामना करावा लागला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर त्यांचे प्रश्न सोडवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.