Unique gathering of planets and stars : नवीन वर्षाच्या प्रारंभी प्रयागराज येथे आयोजित देश, विदेशातील संत, महंतांच्या महाकुंभ मेळ्याच्या वेळीच नभोमंडपातही ग्रह-तारकांचा अनोखा मेळावा एकत्र बघता येईल. विशेष म्हणजे येत्या 7 जानेवारीला सुमारे 7 घटनांचा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी आणि 25 जानेवारीला सूर्यमालेतील सर्व ग्रह एका बाजूला येण्याची दुर्मिळ घटना आकाशप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी असेल. याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
या नववर्षाच्या सातव्या दिवशी 7 जानेवारीला सायंकाळी 7 च्या सुमारास सूर्यमालेतील 7 खगोल, 7 राशी, नक्षत्र समूहातील 7 व्या पुनर्वसू नक्षत्राचे व 7 तारकांच्या सप्तर्षींच्या उदयाच्या वेळी, 7 बहिणींच्या व 7 तारकांच्या कृत्तिका नक्षत्राच्या उपस्थितीत, 7 चंद्र दर्शनाचा हा अनोखा अनुपम सोहळा संपन्न होत असताना आपण सर्वांनी त्याचा सार्वत्रिक आनंद घ्यावा, असे आवाहन दोड यांनी केले आहे.
एकाच वेळी सात खगोल एकत्र
7 जानेवारीला संध्याकाळी 7 च्या सुमारास सूर्यमालेतील सात ग्रह बघता येतील. यावेळी आपण पृथ्वीवरून पश्चिमेस शुक्राची तेजस्वी चांदणी 25 ओवर, जरा वर शनी ग्रह 35 ओवर कुंभ राशीत, नंतरचा नेपच्यून 47 ओवर आणि आकाश मध्याशी अष्टमीचा अर्धा चंद्र 75 ओवर मीन राशीत, नंतर पूर्वेस वर युरेनस 74 ओवर मेषेत, त्याच्याजवळचा ठळक गुरू ग्रह 56 ओवर वृषभ राशीत रोहिणीजवळ आणि पूर्व क्षितिजावर उदित लालसर मंगळ ग्रह कर्क राशीत आपल्या स्वागताला सज्ज असेल.
एकाच वेळी दिसतील सात राशी
सूर्य, चंद्र व ग्रह आकाशात ज्या मार्गाने सूर्याभोवती फिरतात त्याला आयनिकवृत्त किंवा राशीचक्र म्हणतात. या 12 राशींतील पूर्व क्षितिजावर नुकतीच उदय पावणारी कर्क राशी, तिच्या वरची मिथून, नंतरची वृषभ व पुढे मेष अश्विनीसह बघता येईल. यावेळी अष्टमीचा अर्धा चंद्र मीन राशीत व नंतर पश्चिमेस कुंभ राशी व मकर राशी मावळतीला असेल.
सात चंद्राचे दर्शन
रोज दिसणाèया आपल्या चंद्रासारखेच सात चंद्र बघता येतील. त्यात चार चंद्र गुरू ग्रहाचे आणि शुक्र ग्रहाला अष्टमीच्या चंद्राप्रमाणे तर बुध ग्रहाचा आकार एकादशीला दिसणाèया चंद्रासारखा अनुभवता येईल. मात्र, आपला चंद्र सोडून बाकी सहा चंद्र दुर्बिणीतून बघता येतील, असे खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी माहिती देताना सांगितले आहे.