मुंबई : आधार कार्डवरील जन्मतारीख हा वयाचा पुरावा होऊ शकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलीसांच्या याचिकेवर दिला आहे. मुळात आधार कार्ड हा वास्तव्याचा पुरावा आहे. त्याचा वापर जन्मतारीख तपासण्यासाठी केला जाऊ शकत नाही, ते जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये ,असे दि. २८ जुलै रोजी न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपी अल्वयीन आहे की नाही याचा शोध पुणे पोलीसांना आधार कार्डवरून घेत होते.
वाकड परिसरात एक खून झाला होता. या प्रकरणाचा पोलीस तपास घेत होते. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आले. त्यातील एक संशयित आरोपी हा उत्तर प्रदेशमधील होता. त्यावेळी त्यांच्या कागदपत्रावरून पोलीसांना त्यांची जन्मतारीख १९९९ अशी असल्याचे त्यांनी सादर केले. मात्र त्यांच्या आधारकार्डवर २००३ अशी जन्मतारीख होती.
मात्र जन्मतारीख आणि दोन आधारकार्ड असा प्रश्न पोलीसांनी पडला. त्यानंतर त्याच्या आधारचा पूर्ण तपशील मिळायला हवा, अशी मागणी करणारी याचिका पुणे पोलिसांनी केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने वयाचा पुरावा आधारचा तपशील होऊ शकत नाही. असे म्हणत पुणे पोलिसांची ही याचिका पूर्णतः फेटाळून लावली.