सोलापूर :
बाज की असली उडान अभी बाकी है
तुम्हारे इरांदों का इम्तिहान अभी बाकी है
अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन तुमने
अभी पुरा आसमान बाकी है…
माढा लोकसभा व सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार रणजितसिह नाईक निंबाळकर व राम सातपुते यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. ही सभा अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शायरी करत अभिजित पाटील यांचे कौतुक केले. त्यांनी कारखान्याबाबत बोलताना आई व बाळ दोघेही जगवायचं असल्याचं म्हटले. 2018 पासून माझी व अभिजीत पाटील यांची ओळख असल्याचे सांगितले. राज्यात कुठेही बंद पडलेला कारखाना असला तर तो घ्यायचा व त्याला ३५-४० दिवसात सुरु करण्याची किमया अभिजित पाटलांकडे असल्याचे म्हटले. अभिजित पाटील हे सहकार क्षेत्रा ऐवजी खासगी क्षेत्रात राहिले असते तर एक मराठी माणूस मोठा उद्योजक झाल्याचे पाहायला मिळाले असते. चं कौतुक केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजीत पाटील यांच्या भाजपातील प्रवेशावर मत मांडले. काहींनी असा अपप्रचार केला की, अभिजीत पाटलांना आम्ही खिंडीत गाठलंय, पण अभिजीत पाटील खिंडीत येणाऱ्यांपैकी नाही. जो सातत्याने लढतो, त्यांना खिंडीत गाठलं जात नाही. पण, परिस्थिती अशी तयार झाली. कारण, तेव्हाच्या सरकारने तुम्हाला मदत केली नाही. निवडणुकीच्या काळात स्टे हटला आणि अडचण निर्माण झाली, हा योगायोग आहे. मात्र, अभिजीत पाटील यांच्यावर आमचा डोळा होताच. पण, शहाजी बापूंनी मला सांगितलं, अभिजीत माझा भाचा आहे, त्याला मदत करायचीय. तेव्हा हा “देवेंद्र फडणवीस” देवेंद्र फडणवीस चांगलं काम करणाऱ्या सर्वांनाच मदत करतो, असे फडणवीसांनी म्हटलं.
अप्रत्यक्षपणे दिले विधानसभेच्या तयारीचे संकेत
कारखाना व राजकारण दोघे महत्वाचे आहे. अभिजित पाटील तुम्ही काळजी करु नका, तुमच्या जे मनात आहे, लोकांच्या मनात जे आहे तेच माझ्या मनात असल्याचे सागंत फडणवीस यांनी अभिजित पाटील याना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले आहेत. योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू,नव्या पिढीत असा कार्यकर्ता-नेता उभा राहतो, जो बुडलेल्यांना वर काढतो, तो अभिजीत पाटील आहे, अशा शब्दात फडणवीसांनी अभिजीत पाटील यांचे कौतुक केले.