---Advertisement---

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित गजाआड

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । जामनेर तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २१ वर्षीय तरुणानं अत्याचार केला.या प्रकरणी तरुणाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अक्षय उर्फ आकाश जितेंद्र जाधव (वय २१) असे अटक संशयित आरोपीचे नाव आहे. पिडीतने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२२ (दिनांक व वेळ आठवत नाही) या काळात अक्षयने त्याच्या शेतात सदर पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या प्रकरणी पहूर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment