ACB News: जळगाव: लाचलुचपत प्रतिबंधक विभागा जळगाव युनिटने सन २०२४ मध्ये एकूण ३७ सापळा कारवाई केली आहे. या कारवाईत ६० आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. जळगाव युनिटच्या कारवाईमध्ये एकूण ६० आरोपींची अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाने वर्षभराच्या कारवाईत सर्वाधिक जिल्हा परिषदेतून ७ कारवाई १४ आरोपीना अटक करण्यात आली आहे. यासोबतच महसूल विभागात देखील ७ कारवाई करत ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
विभागानुसार कारवाईची माहिती:
महसूल विभाग: ७ कारवाईत ११ आरोपी
जिल्हापरिषद विभाग: ७ कारवाईत १४ आरोपी
पोलीस विभाग: ५ कारवाईत ८ आरोपी
विज वितरण विभाग: ४ कारवाईत ८ आरोपी
उद्योग, उर्जा व कामगार विभाग: २ कारवाईत २ आरोपी
शिक्षण विभाग: २ कारवाईत २ आरोपी
सरपंच व इतर लोकसेवक: ४ कारवाईत ७ आरोपी
खाजगी इसम: २ कारवाईत २ आरोपी
आर.टी.ओ. विभाग: १ कारवाईत २ आरोपी
दारुबंदी विभाग: १ कारवाईत २ आरोपी
म.न.पा. विभाग: १ कारवाईत १ आरोपी
बी.एच.आर. पतसंस्था: १ कारवाईत २ आरोपी
एकूण ३७ सापळ्यात ६० आरोपीना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये अधिक ५ कारवाया वाढल्या आहेत. २०२३ मध्ये ३२ कारवायांमध्ये ५१ आरोपी होते, तर २०२४ मध्ये ३७ कारवायांमध्ये ६० आरोपी अटकेत गेले आहेत.
दिशा आणि मार्गदर्शन
या कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जळगाव विभागातील अधिकारी पोलीस उप अधिक्षक योगेश ठाकूर व अंमलदार यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे.