Accdint News: टँकरचे ब्रेक फेल, लोक जीव मुठीत घेऊन पळत सुटले, चालक जागीच ठार

विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातील बोगद्याला धडकून टँकरचा भीषण अपघात झाला. हा अपघात दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात इतका भीषण होता कॅबिनचा चक्काचूर होऊन चालक जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे व पोलिस कर्मचारी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अपघात मयत झालेल्या टँकरचालकाची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.

ब्रेक फेल झालेले टैंकर समोरून येताना दिसल्याने काहींनी जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढला होता. नागरिकांना टँकर वेगात येत असल्याचे दिसल्याने त्यांनी सुरक्षित जागा धरल्याने मोठा अनर्थ टळला. धडकेमुळे टैंकर फुटून तेल वाहत असल्याने बसस्थानक परिसरातील रस्ते चिखलमय झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार,  टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो थेट महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी तयार केलेल्या बोगद्याला धडकला महामार्गावर नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातील बोगद्याला धडकून टँकरचा भीषण अपघात झाला. गुरुवारी ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगातील टँकर बोगद्याला धडकल्याने कॅबिनचा चक्काचूर होऊन चालक जागीच ठार झाला. धडकेमुळे टँकरमधील सरकीचे तेल रस्त्यावर वाहत असल्याने आग लागण्याच्या भीतीने गावात पळापळ झाली होती. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथपणे सुरू आहे. गुरुवारी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास सरकीचे कच्चे तेल घेऊन जाणारा टैंकर जीजे- १२, बीटी- ५०१२ भरधाव वेगात नवापूरच्या दिशेने निघाला होता.