---Advertisement---

accident : बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात

---Advertisement---

accident : बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकी च्या भीषण अपघातात दुचाकीवर असणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अपघातात मृत असलेले तिघेही बहिण-भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झालेत. मयत झालेले तिघेजण परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृत बहीण भावाची नावं आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळी दहा वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेल समोर आपल्या दुचाकीवरून अंभोरे बहिण भाऊ प्रवास करत होते. याचवेळी दोन हायवांमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरु होती. याच स्पर्धेच्या नादात दोन्ही पैकी एका हायवा चालकाने अंभोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. थेट अंगावरून हायवा गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला असल्याची माहिती उपस्थितीत नागरिकांनी दिली आहे. तर, तिनही मृतदेह शासकीय घाटी रूग्णालयात पाठवले आहे.

अपघातात मृत झालेले तिघेही बहीण-भाऊ आहेत. तिघांचे वय वीस ते पंचवीस वर्षे आहे. घटनास्थळी वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट आढळून आले आहेत. त्यामुळे तिघेही बहीण भाऊ परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment