Accident News : धावत्या रेल्वेतुन पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा : पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानक दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेबाबत पाचोरा शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असेही की, 2 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे किमी नंबर 365/11 ते 13 दरम्यान डाऊनलाईन मध्ये कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. अनोळखी मयत इसमाचे (वय- 40)वर्षे असून रंग सावळा, चेहरा लांबट, अंगात टी-शर्ट  काळे पिवळे पांढरे पट्टे असलेले, लाल रंगाचे अंडरविअर, गुडघ्यापर्यंत काळ्या  रंगाची पॅन्ट असे वर्णन असून या घटनेबाबत पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित साळुंखे यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे सदर घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक हटकर हे करीत असून मयत अनोळखी इसमाबाबत ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.