जळगाव : भरधाव जाणारा पामतेलचा टँकर अचानक उलटला, या अपघातामुळे टँकरमधील तेल महामार्गांवर मोठ्या प्रमाणात सांडले होते. हा अपघात जळगा – धुळे महामार्गांवरील पाळधी गावाजवळ शनिवारी रात्री धुळेकडून जळगावकडे जाणारा भरलेला टँकरवरचा चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अपघात होऊन टँकर पटलटताच त्यांतून मोठ्या प्रमाणात पामतेल सांडले. यावेळी पामतेलाचे पाट महामार्गावर पसरले. याची पाळधी गावात या अपघाताची खबर जाताच ग्रामस्थांनी तात्काळ अपघात स्थळाकडे धाव घेतली. ता ग्रामस्थांची तेल गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. ग्रामस्थांनी त्यांना मिळेल त्या भांड्यात तेल घ्यायला सुरुवात केली. ही परिस्थिती गंभीर होती त्यातच महामार्गावर साचलेल्या तेलामुळे रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला.
या अपघातात चालक थोडक्यात बचावला. हा मोठा अपघात झालेला असला तरी या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला नाही. हा टँकर रस्त्याच्या कडेला उलटला होता.